“होय, तो सर्वस्वी मनोहर आहे!” गीतरत्न ५:१६
हरवलेली (तारण न पावलेली) माणसे ख्रिस्ताच्या विस्मयजनक सौंदर्याकडे पाहू शकत नाहीत. त्याच्याठायी सर्व चकाकणारे सौंदर्य आढळते, पण ते पाहण्यासाठी त्यांच्याकडे आत्मिक डोळ्यांचा अभाव आहे!
तो {ख्रिस्त} असीम आणि उत्कृष्टपणे मनोहर आहे. येशूबद्दल आपण जे काही बोलू शकतो ते सर्व त्याच्या अतुलनीय मूल्यापेक्षा अतिशय त्रोटक असे ठरते. तो शुद्ध, आणि त्याचे सौंदर्य डागविरहीत आहे! त्याच्या सौंदर्यात, एक भव्य चमक आहे आणि ते अतिशय दिव्य आहे.
येशुने दुःख भोगून आमच्यासाठी खंडणी भरून दिली तेव्हा त्यात तो अति मनोहर होता. काय, दु:ख सहनात तो मनोहर होता? जेव्हा त्याला फटके मारण्यात, त्याजवर थुंकण्यात आले, आणि तो रक्ताने माखलेला होते तेव्हा मनोहर होता?
होय, तो वधस्तंभावर सर्वात अधिक मनोहर होता, कारण तेथेच त्याने आम्हाला सर्वात जास्त प्रीती दाखवली.
त्याच्या प्रत्येक नसातून – त्याने प्रीतीचा स्त्राव वाहिला.
ते ओघळणारे थेंब – प्रीतीचे थेंब होते! जेवढा अधिक तो रक्ताळलेला होता – तेवढा अधिक तो मनोहर दिसला!
अहा, मग आमच्या नेत्रांकरीता तो रक्ताळलेला तारणारा किती मनोहर असला पाहीजे!
चला तर मग हा वधस्तंभावरील खिळलेला ख्रिस्त सदैव आपल्या अंतकरणात जतन करू!
ख्रिस्ताचा वधस्तंभ म्हणजे आपल्यासाठी स्वर्गाचे दार उघडणारी किल्ली आहे!
ख्रिस्त वधस्तंभावर किती मनोहर आहे! त्याच्या रक्तातील लालीने, आमची लाखेसारखी लाल असलेले अपराध आम्हांपासून दूर केले!
ख्रिस्ताला वधस्तंभावर चढविणे हा आमचा राज्याभिषेक आहे!
त्यांने त्याच्या पित्याचे उर, जे मधुरतेचे पोळ होते, ते या दीन जगात येऊन राहण्यासाठी सोडले. खरं तर, त्याने राजवाडा केरकचऱ्याच्या ढिगाऱ्यासाठी सोडला.
“ख्रिस्ताची अगाध समृद्धी” च्या खाणीचा तळ देवदूतही खणून काढू शकत नाहीत! ते ख्रिस्ताची भक्ती करतात, त्यांच्या आश्चर्यकारक मनोहरतेने ते अति आनंदित होतात!
येशु हा सौंदर्याचा सार आणि सौदर्यांचे अत्युत्तम उदाहरण आहे. तो आनंदाचा संपूर्ण स्वर्ग आहे!